Ad will apear here
Next
‘चित्रपट चावडी’वर पाहा ‘टू डेज वन नाइट’
नाशिक : मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र व नाशिक येथील विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८, कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी, १६ जून २०१७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बेल्जियमचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक जॉ पिएरे आणि ल्युक दार्दान यांचा ‘टू डेज वन नाइट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 

‘टू डेज वन नाइट’ चित्रपटातील नायिका सँड्रा बेल्जियममधील एका शहरातील कारखान्यात काम करत असते. कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून एका विभागातील एका कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला जातो. त्या बदल्यात इतरांना काही बोनस देण्याचेही ठरविले जाते. योगायोगाने सँड्रावर त्या निर्णयात नोकरी जाण्याची वेळ येते. तिच्याकडे फक्त दोन दिवस व एक रात्र आहे. सँड्रा त्या काळात आपली नोकरी टिकविण्यासाठी काय करते ते पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. दार्दान बंधू जनसामान्यांच्या अपरिहार्य घटनांवर आधारित चित्रपट बनवितात व त्यातील पेचप्रसंग ते मार्मिकपणे खुलवितात. २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९५ मिनिटांचा आहे.

‘टू डेज वन नाइट’ हा चित्रपट बघण्यास चित्रपटप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे. 

दिनांक : १६ जून २०१७ 
वेळ :  सायंकाळी साडेसहा वाजता 
स्थळ : डिझास्टर मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – ४२२ ०१३
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZJEBD
Similar Posts
नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा नाशिक : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक येथील विभागीय केंद्रातर्फे शनिवारी, २७ मे रोजी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील नितीन देशमुख, तसेच अरुण सोनवणे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी ३०० रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,
व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळा नाशिक : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कोल्हापूरचे संजय हळदीकर सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. सर्व इच्छुकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाविषयी
चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘डियर डायरी’ चित्रपट नाशिक : ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध इटालियन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘डियर डायरी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०
‘चित्रपट चावडी’ कार्यक्रमात ‘ए समर्स टेल’ चित्रपट नाशिक : ‘चित्रपट चावडी’ या उपक्रमांतर्गत २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘ए समर्स टेल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपटासाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language